नवीन लेखन...

क्वांटम कॉम्प्युटर

क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते. […]

डॉ. रघुनाथ माशेलकर

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही केली. त्यानंतर ते इंग्लंडच्या सालफोर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये संशोधन केले. तेथून परत आल्यावर ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. सहा वर्षे ते या लॅबोरेटरीचे […]

गंगा-गोदावरी

घरात पोरीला बघाय पावणं येणार म्हणून ती पाय भराभरा उचलत होती. डोक्यावरचा पाण्याचा हंडा डुचमळत होता. पाणी केसावरनं चेहऱ्यावर ओघळत होतं. चार मैलावरनं पाणी आणाय लागायचं. पाच-सात गावात तेवढ्या एकाच विहिरीला पाणी राहिलं होतं. दिवसातनं दोन हंडे पाणी आणायचं म्हटलं तरी मान आणि पाय भरून यायचे. त्यात तिथं विहिरीवरही झुंबड असायची. […]

सुमनसुगंध

प्रसन्न मुद्रा, स्नेहाळ हास्य आणि मधासारखा गोड गळा लाभलेल्या सुमन कल्याणपूर यांचे नाव आजही संगीत क्षेत्रात अदबीने घेतले जाते. कोणत्याही वादात न पडणाऱ्या सुमनताई मितभाषी असून, त्यांचे जीवन साधे, सुंदर आहे. […]

हेडफोन

हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही. […]

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये

प्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अॅण्ड इकनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये […]

महालयारंभ

भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे. […]

शुभं करोति

तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची. […]

प्लाझ्मा टीव्ही

एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात. […]

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. एस. के. के. जतकर

प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर. ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. केले. प्रथम ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात अध्यापनासाठी गेले, पण संशोधनाची तीव्र इच्छा असल्याने तेबंगलोरच्या परत इंडियन […]

1 2 3 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..