वृद्धत्व : सत्य की काल्पनिक!
वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही. […]