नवीन लेखन...

अनंत चतुर्दशी

हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही. […]

अखंड खंड

पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. […]

एलइडी टीव्ही

एलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही असे म्हणतात. […]

एक अतूट बंधन

माझ्या प्रिय वाचकांनो, ‘विवाह’ हा एक अत्यंत जटिल प्रवास सोसण्याचा, आहे. करण्याचा, करून घेण्याचा, प्रसंगी दोन पावले मागे येण्याचा, कधी आक्रमक होण्याचा तर कधी आपले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून एकांत शोधण्याचा, मायेचा, अंतरीच्या ओव्यांचा एक अथक प्रवास. […]

कैवल्यतेजाची शालीनता!

ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे. चमत्कारंच! त्यांचं भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं हे चमत्कार कुणी श्रद्धेनुसार मानावेत वा न मानावेत.. सोळाव्या वर्षी एखादी व्यक्ती गीतेवर इतकं रसोत्कट, सखोल आणि सामान्य सकळांना आपलंसं वाटणारं, जीवनोद्धार करणारं भाष्य लिहिते, अभंग रचते, अखिल विश्वासाठी पसायदान मागते, वारकरी पंथाचा पाया रचते, एकविसाव्याच वर्षी संजीवन समाधी […]

हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)

हाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात. […]

वामन जयंती

विष्णूंच्या दश अवतारातील पाचवा अवतार वामन. हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी श्रवण नक्षत्रावर झाला. म्हणून या दिवशी वामन जयंती साजरी करतात. या तिथीला काही भागात वामन द्वादशी असेही म्हणतात. […]

एलसीडी टीव्ही

एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. […]

वेब टीव्ही

कोची येथील एका मीडिया कंपनीकडून इंडिया व्हाईब हा वेब टीव्ही सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतात त्या निमित्ताने वेबटीव्ही पहिल्यांदाच येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेब टीव्ही ही कल्पना नवीन नाही, ती टीव्ही पाहण्याची एक वेगळी पद्धत आहे इतकेच म्हणता येईल. […]

अदुःख नवमी

भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. […]

1 2 3 4 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..