नवीन लेखन...

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर

सई लोकूर मूळची बेळगावची. सईचे बालपण आणि शालेय शिक्षण सुध्दा बेळगावातच झाले. १२ वी नंतर ती मुंबईला आली. सई लोकूर ही गेली तीस हून अधिक वर्षे बेळगावातील नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांची कन्या. सईच्या बालपणी तिच्या आईने खूप क्लासेस लावले होते. […]

जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे

पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले. […]

श्रीकृष्ण-जयंती

कृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. […]

ग्राफिक कार्ड

अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. […]

पचन चांगले तर रोग पांगले

‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे त्याच्या पूजेत मग्न असणारे. तेजाच्या म्हणजे अग्नीच्या पूजेत रत असलेल्या लोकांचा समूह म्हणजे भारत. ही व्याख्याच सांगते की आपण समस्त भारतीय मूलतः तेजाचे पुजारी आहोत. ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तातील पहिली ऋचा अग्नीच्या पूजनाचीच आहे: […]

गोपाळ काला

श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी. सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. […]

ब्लूटूथ तंत्रज्ञान

ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते. […]

इंदू वंदन

घरची स्त्रीच घराला घरपण देत असते… आज्जीच्या प्रसन्न स्वभावाने कोकणातलं घरही सदैव समाधानाच्या सरींत भिजत राहिलं… पैशांची श्रीमंती असली म्हणजेच माणूस मणभर सुखी होतं नसतो… जे मिळालं आहे त्यात संतुष्टता आणि समाधान मानलं तरच मन भर सुख त्याला मिळतं… […]

गृहिणीची अर्थनीती

भारतीय ‘गृहलक्ष्मी’ मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, शहरी अथवा ग्रामीण असो. शिक्षित वा अशिक्षित असो. ती मर्यादित जिन्नस वापरून उत्तम स्वयंपाक करते आणि कुटुंबाला पोटभर खाऊ घालते. तशीच मर्यादित उत्पन्नामध्ये घर चालवते. घरखर्च भागवते आणि वर बचतही करते. […]

ज्येष्ठ अभिनेते रवि पटवर्धन

ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले. […]

1 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..