नवीन लेखन...

नैसर्गिक आणि कृत्रिम प्लास्टिक

डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. […]

श्री मोरया गोसावी आणि चिंचवड परंपरा

मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]

ट्यूबलेस टायर

मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन नको त्या वेळी पंक्चर झाले तर काय डोकेदुखी होते हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठीच अलिकडे ट्यूबलेस टायर वापरले जातात. यात नावातच सांगितल्याप्रमाणे फक्त टायर असतो व ट्यूब मात्र नसते. […]

डीएनएचे ठसे

पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात. […]

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य. […]

चेहरा

मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि धमाल करण्याचा महिना. तुमच्या या धमाल आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक विज्ञानकथा. विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी आणि भावना यांचे आगळेच रसायन असणारी ही कथा आहे. आम्हांला खात्री आहे की, ती तुम्हांला नक्की आवडेल! […]

मौज टांग्याची

अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो. […]

बर्म्युडा

जवळपास सगळ्या शहरात हे चित्र दिसते. पनीर पिझ्झा खाऊन गुबगुबीत झालेलं कुत्रं मालकासोबत डुलत डुलत अख्ख्या कॉलनीत फिरून वजन हलकं करूनच घरी जातं. त्याच्या सर्व विधी आटोपतांना मालकाच्या चेहर्‍यावर इतके संतुष्टीचे भाव उमटतात की जणू काही त्यांचाच भार कमी झालाय. […]

रूम हिटर

आपल्या देशात अनेक ठिकाणी रूम हीटरची फारशी आवश्यकता भासत नसली तरी जिथे बर्फ पडण्याइतकी थंडी असते तिथे ते वापरावे लागतात. रूम हीटरला खरेतर स्पेस हीटर असे म्हणतात. बंदिस्त खोलीतील हवा उबदार करण्याचे काम हे यंत्र करीत असते. […]

डीएनएमधील नत्रयुक्त घटक

डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि, पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील ॲडेनीन, रायबोज साखरेबरोबर अँडिनोसिनचा रेणू बनवितो. अँडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते. […]

1 2 3 4 5 6 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..