October 2023
पुन:श्च हरिओम
हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता. […]
‘चोखोबा’ माझा गणपती!
‘गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून. […]
बाॅबी ५० वर्षांची झाली
परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
बाॅबी हा सिनेमा…. […]
कुणाची लायकी ठरते कधी ना जात धर्मावर
कुणाची लायकी ठरते कधी ना जात धर्मावर इथे माणूस जातो पूजला आगाध ज्ञानावर कुणीही उच्च अथवा नीच नाही जन्मतः येथे इथे तर माणसा जाती तुझ्या पडल्यात कर्मावर कितीदा माफ केलेले पुन्हा करणार नाही मी पुन्हा येऊ नको देऊ गड्या तक्रार कानावर तुझ्या माझ्यामधी अंतर कधीही ठेवले नाही तुला का आठवेना जेवलो एकाच पानावर उभ्या जन्मात नाही […]
फ्लाइंग कार
ट्रॅफिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् ती हवेत उडाली तर ट्रैफिक जॅमची कटकट नाही. हो, आताच्या शतकात अशी सोय झाली आहे. […]
खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?
खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे. […]
सुपर कॉम्प्युटर (महासंगणक)
१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला. […]
राधाकाकीचा वाडा
बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!! […]
संस्कृती रक्षण
संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची. […]