आठव स्मृतींचे
कधीतरी बोलना तूं एकदा गुज तुझ्या अव्यक्त अंतरीचे आता सरला हा जन्म सारा गहिवरले हे हुंदके भावनांचे गोठले स्नेहार्द भाव अंतरात भिजले चिंब पदर पापण्यांचे सांग! मनास कसे समजवावे दारुण दग्धदुःख या जीवनाचे हरविले सारे व्याकुळला जीव तरीही लोचनी आठव स्मृतींचे रचना क्र. १३४ / ४ / १० / २०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908