इशाऱ्यांची भाषा
प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्याही एकमेकांशी संपर्क साधण्याच्या भाषा असतात. मात्र या भाषा रासायनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळा ही रसायनं या वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतून, तर काही वेळा पानांद्वारे हवेतून, एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीकडे पोचवली जातात. एखाद्या वनस्पतीला जेव्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होतो, तेव्हा ती वनस्पती आजूबाजूच्या तिच्या भाऊबंदांना धोक्याची सूचना देऊन सावध करते. […]