उपनयन विधी
नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई […]