गोरं करणारा साबण
गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे. […]