नवीन लेखन...

कोलेस्ट्रेरॉल

कोलेस्ट्रेरॉल एक भयावह प्रकार. पण भिण्याचे काहीच कारण नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोलेस्ट्रेरोल वयाच्या २० वर्षापर्यंत लहान मूल अथवा मुलीला कसलीच भीती नाही. मात्र पुरुषांच्या वयाच्या ३५ वर्षानंतर पुरुष अथवा स्त्री करीता वयाच्या ४५ वर्षानंतर जर छातीकरीता अपाय होत असेल, जसे छातीतील जळजळ होणे अथवा छातीत दुखणे वगैरे तक्रार असल्यास डॉक्टरला दाखवून लिपीड प्रोफाईल नावाची एक रोग्याची तपासणी अवश्य करून घ्यावी. यामध्ये कोलेस्ट्रेरॉलमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे लोडेंसीटी कोलेस्ट्रेरॉल याला एल.डी.एल. असे म्हणतात. […]

रेणुगंधांचा शोध

माणूस आपल्या नाकाद्वारे विविध गंध ओळखतो, वेगवेगळ्या गंधांतला फरक सांगू शकतो. एखाद्या रसायनाचा गंध ओळखणं म्हणजे, त्या रसायनाच्या रेणूंची आपल्या घ्राणेंद्रियांशी झालेली क्रिया असते. मात्र एखाद्या रसायनाचा वास नक्की कसा आहे, हे त्या रसायनाच्या रेणूच्या रचनेवरून निश्चितपणे सांगणं, शक्य असतंच असं नाही. रसायनाच्या रेणूच्या रचनेतील, अणूंच्या काही ठरावीक गटांवरून त्या रसायनाच्या वासाचा अंदाज बांधता येत असला, तरी त्याला मर्यादा आहेत. अनेकवेळा जवळपास सारखी रेण्वीय रचना असणाऱ्या दोन रसायनांचा वास वेगळा असू शकतो. […]

संस्कारांच्या भिंती

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही. […]

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता. […]

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी. […]

विधायकतेच्या वाटेवर

एकुणच भारतात मुद्रणाची कला सार्वजनिक होत गेली आणि त्या सोबत प्रसार माध्यमांचा ‘प्रसार’ होण्यास सुरवात झाली. पहिली १५० वर्षे प्रसार माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, नियतकालिके असंच स्वरूप होतं. १९८० नंतर आपल्याकडे दूरदर्शनचे जाळे पसरू लागले. २० व्या शतकाच्या अगदी शेवटी शेवटी खासगी दूरदर्शन वाहिन्यांची सुरुवात झाली. २१ व्या शतकात पहिल्या दशकानंतर सामाजिक माध्यमं (सोशल मिडीया) सुरू झाली. […]

ई-कोलाय

माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला. […]

पाणी ‘वैश्विक द्रावक’ का आहे?

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे. […]

भारतीय लोकजीवन आणि कृषी परंपरा

मराठवाड्याच्या सीमेवरील उन्हाळ्यामध्ये तापणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर येथे मला २०१६ साली भर उन्हाळ्यात जाण्याचा योग आला. ठिकाण होते, ‘कोंबळणे’ गाव, तालुका अकोला आणि शेत होते राहीबाई सोमा पोपेरे यांचे. नगरच्या दुष्काळी भागातील तो हिरवाकंच पट्टा म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीचे एक विसाव्या शतकामधील खरेखुरे दर्शनच. […]

अमायनो ॲसिड

अमायनो ॲसिड साठवता येत नाही, हा अतिशय महत्त्वाचा शोध होता. डॉ. रोज याप्रमाणे नेहमी अमायनो ॲसिड शोधून त्याला नाव दिले. लेओनिन यांनी त्याला नाव दिले इसेंशियल अमायनो ॲसिड. असे डॉ. रोज यांनी पहिल्या प्रथम दहा अमायनो ॲसिड आणि त्याला विशेष नाव दिले. आता यात काही अमायनो ॲसिड बाहेरूच घ्यावी लागतात. […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..