नवीन लेखन...

उपवास

हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते. […]

स्वीडनमध्ये वही-पेन चा वापर

स्वीडनमध्ये आता लोकांना टॅब्लेट, संगणक आदी तांत्रिक, डिजिटल उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. या ऐवजी आता पुन्हा वही व पेन म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्याची याच शैक्षणिक सत्रापासून सुरुवात झाली आहे. […]

जाग

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली नितीन प्रवीण शिंदे यांची हि कविता थांग पाणावून गेला सागराचा तीर जेथे, दूर तेथे जावयाचे. चांदण्यांचे पंख लाभो, वा न लाभो काजव्यांना सोबतीला घ्यावयाचे. तूच नाही एकला मार्गस्थ येथे जात आहे जन्म ओलांडीत जो तो. पैल जायाचे कुठे ? ठाऊक नाही गात आहे आसवे सांडीत जो तो. […]

राजमुकुटाची चोरी

खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती. तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता. बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात. निवांत जरी निवांत असला तरी […]

निवडणुका आणि प्रसारमाध्यमे

सन २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहौल सुरू झाला आहे. चढत्या क्रमाने त्याची रंगत वाढत जाणार आहे, रंग बदलत जाणार आहेत. भारतीय लोकशाहीसाठी तर निवडणूक हा मोठा सोहळाच. या सोहळ्याचे स्वरूप मात्र खूप झपाट्याने पालटत चालले आहे. […]

फणस

फणस हा मूळचा भारतीयच आहे. भारतातील फणसाची सर्वात जास्त झाडे आसाममध्ये आहेत. त्या खालोखाल बिहारमध्ये आहेत. उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याशी उतारावर फणसाची झाडे वाढतात. पश्चिम बंगालमध्ये जंगलातून फणस आढळतो. दक्षिण हिंदुस्थानात २४००० मीटर उंचीवरही फणस वाढतो. पूर्व व पश्चिम किनारपट्टीत फणस चांगला वाढतो. महाराष्ट्रात मात्र फणसाची झाडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत. थोडीफार झाडे ठाणे, रायगड जिल्ह्यातही आढळतात. औरंगाबाद येथेही थोड्याफार प्रमाणात फणसाचे उत्पादन होते. […]

खजूर

एक अत्यंत पौष्टिक आणि संपूर्ण जीवनसत्त्वे, खजिने असलेले म्हणजे खजूर खजूर हे म्हणजे अरबस्तानातील नाईल नदीच्या तीरावर आढळतात. अरबस्तानातील जवळ जवळ सर्वच लोक अगदी नियमितपणे खजूर खातात कारण त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची शक्ती प्रचंड वाढते. […]

जिव्हाळ्याचं बेट

लहानपणी मला तुझ्या आजोळी नातेवाईक किती, असा प्रश्न विचारला की मी लगेच सांगायचे, पाच मामा, पाच मावश्या, मग सगळ्यांची नावं सांगायचे. मावश्यांची नावं सांगताना अक्का, ताई, शकू, शालू आणि जोशी असं सांगायचे. बाकी सगळ्यांची नावं घेऊन मी पुढे मावशी म्हणायचे आणि या मावशीला मात्र जोशी असं आडनाव घेऊन मावशी म्हणायचे. […]

झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले. […]

स्वातंत्र्य

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता मुलांना ठाऊकही नसतो जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ तेव्हाच खरेतर ती स्वतंत्र असतात वरवर आज्ञाधारक वाटली तरी ती त्यांच्या आतल्या हाकांना ओ देत असतात आपण शिकवत रहातो यांना धुरकटलेले अर्थ निरअर्थ मुले तेव्हा असतात त्यांच्या गुहेतल्या वाटा खोदण्यात मग्न आपण गिरवून घेत असतो धुळभरल्या […]

1 9 10 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..