नवीन लेखन...

लाल भोपळा

जगाच्या पाठीवर लाल भोपळा अनेक ठिकाणी सापडतो. अगदी भारतापासून ते भारताच्या पलीकडे लाल भोपळा मिळतो. मात्र उत्तर अमेरिकेपासून लाल भोपळा त्वरित सापडतो. एवढेच नाही तर लाल भोपळ्याचे अगदी लहान आकारापासून म्हणजे १ किलोग्रॅमपासून ते अगदी ४५० किलोग्रॅमपर्यंतचे भोपळे अमेरिकेत तयार होतात. […]

सोल्वांग

एका शनिवारी आम्ही सोल्वांगला जायला निघालो. लॉस एंजलीसपासून उत्तरेला दीड-दोन तासांच्या अंतरावर समुद्रकिनारी सांता बार्बाराजवळ हे शहर आहे. […]

पुस्तक मिटून ठेव

पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले. […]

पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस

सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या. […]

इजिप्तमधले साप

इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अ‍ॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं. […]

निस्सीम प्रेम

नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या […]

हरभरे अथवा चणे

एक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात. […]

बहुचर्चित अमेरिकन ऑपेरा गायिका मारिया कलास

अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही. […]

काय ब्वॉ?

‘नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो. […]

अमृतमय चंद्रमा

पावसाळा नुकता संपलेला. चार महिने अधूनमधून ढगाआड जाणारा चंद्रमा अश्विनातल्या पौर्णिमेला पूर्ण तेजानं उजळून आलेला. या पौर्णिमेचं स्वतःचं खास स्थान आहे. ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ । रसिकांना कवींना, लक्ष्मीच्या पूजकांना आणि वैद्यांनाही महत्त्वाची वाटते. […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..