नवीन लेखन...

जिवाला ओढ लावणारी “वर्षाअखेर!”

जाणार्‍या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year ! […]

मराठी ग्रंथाभिमान

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील. […]

श्रीयुत विसरभोळे

“एक वेळ पोलीस होऊन पहा, मग त्याची काय अवस्था असते, त्याचा अनुभव येईल. ” मी जीव तोडून सांगत होतो, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा एकच हेका होता, “साहेब तुम्ही मला मुर्ख समजता का? बावळट समजता? आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन येतो आणि तुम्ही आम्हालाच ज्ञान शिकवता? मी शांतपणे हाताची घडी घालून ऐकत होतो. मी, माझ्यातील पोलिसाला […]

हॅास्पिटलमधून बाळ गायब

गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता. […]

ढोबळी मिरची

भारतात आपल्याकडे ढोबळी मिरची फार प्रसिद्ध आहे. आपण त्याला काही लोक सिमला मिरचीसुद्धा म्हणतात. ही मिरची का आली, कशी आली अथवा कुठून आली, हे सांगणे कठीण. काहींच्या मते ही मिरची दक्षिण आशिया खंडातून आली. साधारण १५३० साली ब्रिटनला ही झाडे आली. मात्र अरब लोकांनी ही झाडे लावली व त्याला हिरवे शेत असे म्हणू लागले. काही लोकांच्या मते ही मिरची इराणमधून आली आणि ती भारतात अवतरले. […]

आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते. […]

शुभेच्छापत्रे

किती छोटीशी गोष्ट असते, शुभेच्छा देणं! शुभेच्छा मिळाल्या की प्रसन्न वाटतं… कुणाला तरी आपली आठवण आहे, याचा आनंद होतो. हुरूप येतो. राजकारणी लोक आणि व्यापार-व्यवसायातले शुभेच्छा देण्या-घेण्यात तरबेज असतात. मोठमोठी होर्डिंग्ज लावतात आणि शुभेच्छांच्या बदल्यात मोठमोठ्या हॉटेलमधून पार्ला देतात. […]

‘बर्थ कंट्रोल’ शब्दाची जननी मार्गारेट सॅनगर

लेडी ऑफ कॉन्ट्रासेप्शन’ किंवा ‘कुटुंबनियोजनाची जननी’ किंवा गरिबांची वाली म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात सुप्रसिद्ध झालेली अमेरिकेतील महिला म्हणजे मागरिट सॅनगर! कुटुंबनियोजनासारखा तत्कालीन अश्लाघ्य विषय मागरिटने हाताळल्याने अत्यंत धाडसी आणि शूर महिला म्हणून तिची गणना साऱ्या विश्वात केली गेली आहे. […]

समाजव्रत

‘सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘ […]

माझा वाढदिवस

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. […]

1 2 3 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..