नवीन लेखन...

भाग्यवती

गुणी, समंजस आणि कर्तुत्ववान-समाधानी पतीची साथ, हे माझं सौभाग्य! सुसंस्कृत, कलासक्त माणसांनी भरलेला सासर परिवार, हे माझं सौभाग्य! उत्तम जाणकार आणि विवेकी मित्रपरिवार, हे माझं सौभाग्य! आस्वादक व चोखंदळ वाचक लाभणं हे माझं सौभाग्य!!!! म्हणून म्हणते आहे मी स्वतःला सौभाग्यवती!! तेव्हा कृपया ते सौ. लिहिलेलं खोडू नका!’ […]

डॉ. सॅम्युअल हनेमन – होमिओपॅथीचे जनक (पूर्वार्ध)

डॉ. सॅम्युअल हनेमन हे होमिओपाथी या वैद्यकशास्त्राचे जनक होते. त्यांचा जन्म १७५५ साली झाला. त्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी विविध पद्धती प्रचलित होत्या. अशावेळी डॉ. हनेमन यांनी वैद्यक हे शास्त्रोक्त पद्धतीच्या चौकटीत कसे बसवता येईल याचा शोध घेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. वेगवेगळे सिद्धान्त सिद्ध होत होते. समाजात प्रचलित असलेल्या या अनेक पद्धती वापरताना त्यात शास्त्रीय दृष्टिकोन […]

अतृप्ती

रिमझिमत्या पावसात माझ्या गर्द केसात मोगरा माळताना तू दाखवलीस स्वप्नं… रुणझुणत्या चुड्याची भरजरी शालूच्या स्पर्शाची पराक्रमी राजपुत्रानं नजर करावं गुलबकावलीचं फूल हळव्या राजकन्येला तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली तुझी शपथ, तेव्हा वाटलं पायतळी मंझिल आली ! आणि मग – हातीच्या गुलाबाची पाकळी पाकळी पडावी गळून.. तसे क्षण गेले निसटून नि कसली अगम्य ओढ मनात राहिली दाटून? […]

मशागत मनाची

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय, की त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय, ते त्याला मान्य नसलं तरी ते जगण्याला तो बांधील आहे. आपण अनेकदा वर्तमानपत्रातून वाचलेलं आहे की, […]

काश्मीर एक जाणीव – भाग एक

सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं. कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती . […]

आपुलकी एक शाश्वत सुख

आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते. […]

लोखंडाचा शोध कसा लागला?

खनिजापासून लोखंड बनविण्याच्या प्रक्रियेचा विकास होण्याआधी माणसाला लोखंड माहीत होते. पृथ्वीवर सापडणाऱ्या अशनीमध्ये एक काळ्या रंगाचा धातू मिळत असे. त्या काळात इजिप्तच्या लोकांनी त्याला काळे तांबे असे नाव दिले होते. हा धातू म्हणजे लोखंड आणि ६ ते ८ टक्के निकेल यांचे संमिश्र असे. […]

छत्रपती संभाजी महाराजांचे इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्याशी संबंध

छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पोर्तृगीजांशी असा लढा दिला की पोर्तृगीजांची यापूर्वी कधीही फजिती झाली नव्हती अशी फजिती झाली. अवघ्या 32 वर्षांच्या वादळी आयुष्यात त्यांनी अनेक विजय संपादन केले. एकूण 120 मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही हार पत्करली नाही. […]

संगणकाची सवारी

आता प्रत्येक बँकरच्या तोंडी एक वाक्य कायम असतं  म्यॅन्यूअल बँकिंगची मजाच वेगळी होती, कुणावर अवलंबून रहावे लागत नव्हते, कनेक्टिव्हिटी, रेंज, सॉफ्टवेअर अपडेशन, लॉग इन, असे कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. पूर्वीचे टेलर तर घरापासूनच काम सुरू करायचे, येता येता त्यांना कुणीतरी खात्यात पैसे भरायला द्यायचं, कुणी विड्रॉल द्यायचं, त्याला लगेच पैसे मिळायचे, बँकेत जाता जाता लोक सरकारी चलन भरायला द्यायचे, अशी कितीतरी कामं सुरळीत पार पडायची. […]

धातूंचा शोध

धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले. […]

1 106 107 108 109 110 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..