उपवास
हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते. […]