अभिलाषा
************ मन मुक्त विरक्त आता अभिलाषा उरली नाही संवेदनाशून्य काळीज चिंता कशाचीच नाही…. कोलाहल उगा अंतरी तो कधीच संपत नाही स्पंदनांची चाहूल संथ सामर्थ्य चैतन्यी नाही…. उदय अस्त कालचक्री त्याला कधी अंत नाही सहज सुखा पांघरताना केवळ स्वार्थी होवू नाही…. हरिहर जाणतो सर्वकाही तिथे कुणास सुटका नाही हे सत्यब्रह्मांडी सुर्यप्रकाशी याचा विसर मना पडू नाही…. ********************** […]