नवीन लेखन...

टोकन

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची युनायटेड वेस्टर्न बँक, अंबरनाथ शाखेतील (आताची आयडीबीआय बँक) घटना आहे. पहिला आठवडा व दिवाळी लगेच असल्यामुळे बँकेत गर्दी होती… बचत खात्यातील खातेदार काऊंटरवर टोकन घेऊन कॅशियर समोरील जागेत बसून आपला नंबर येण्याची वाट पहात होते. […]

सूर्यास्ताची दिवाळी

बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती. […]

घर्षण एक उपचार

विज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे. हवा आणि पाण्यातले वाढते प्रदूषण आणि जगण्यातील अनियमितता, पोषण तत्त्वांचा अभाव असलेल्या ब्रेड-बिस्किटे इ. पदार्थांची ओढ, परिणामतः आधुनिक मानवाची ‘प्रतिकारक्षमता’ अत्यंत कमी होऊन मधुमेह, सोरायसिससारखे त्वचाविकार, […]

कोकणातील बागायती फळ शेती

आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत. […]

रक्ताच्या विशेष तपासण्या का कराव्या लागतात ?

वरील तपासण्या खालील रोगांत प्रामुख्याने करतात. मधुमेह यासाठी रक्ताची उपाशीपोटी, जेवणानंतर दोन तासांनी तपासणी करतात. बरोबर लघवीपण तपासतात. यात रक्तातील साखर मोजतात. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण ७० ते ११० मिलिग्रॅम परसेंट व जेवणानंतर १४० मिलिग्रॅम परसेंट असते. यापेक्षा जास्त प्रमाण आढळल्यास व सातत्याने २-३ वेळा हे प्रमाण जास्त असल्यास मधुमेहाचे निदान करतात. मधुमेहात नंतरच्या काळात मायक्रोअलब्युमिन आढळते. […]

गर्दीत माणसांच्या

गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या? शहरात आज साऱ्या ही ‘ईद’ चाललेली त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला? –सौ. राजलक्ष्मी देशपांडे

कपडे वाळत घालणे एक प्रवास

पुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले. […]

झिगार्निक परिणाम

‘आपला मेंदू पूर्ण झालेली कामे अल्पकालीन स्मृतीतून काढून टाकतो.’ याला म्हणतात ’ झिगार्निक परिणाम’ (Zeigarnik Effect). ब्लूमा झिगार्निक या रशियन मानसोपचारतज्ञ महिलेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला. […]

कितना बदल गया जमाना !

माझ्या अभियांत्रिकी दिवसांमध्ये जग काहीच्या काही वेगळंच होतं. त्यातले काही ट्रेसेस सध्या आगंतुकपणे भेटताहेत- उदा. आर एस खुर्मी आणि बी एल थेराजा यांची पुस्तके (२० च्या वर आवृत्या) आजही विद्यार्थ्यांच्या टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांच्या मांडवाखालून किती अभियंत्यांच्या पिढ्या यशस्वीपणे गेल्या आहेत, याचा हिशेब ठेवणं आता चित्रगुप्तालाही अवघड झालं असेल. […]

श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत. […]

1 114 115 116 117 118 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..