सूक्ष्मातील ब्रह्मांड
१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली. […]