नवीन लेखन...

धनुषकोडी आणि रामसेतू…

भारतात प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. भारतात अशा काही जागा आहेत जिथे आजही माणूस आणि निसर्ग एकरूप होतो. जिकडे आजही काही रहस्य आहेत. तामिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातलं धनुषकोडी हे असंच एक गावं. ह्या गावाचा संदर्भ अगदी रामायणातील आहे. […]

गान गुणगान

प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले. […]

ओझं

जड झाला जीव आता ओझं सोसवत नाही… भोग भोगायचे किती आता देवादारी बसवत नाही…! जन्म वाया गेला राबण्यात नाही गाव दुसरं पाहिलं.. भरल्या गोकूळ घराचं सपान मनात राहिलं..! वाट एकटा चालला तिला जोडीला घेतलं.. एक नातं विश्वासाचं त्याच्या जिवावर बेतलं…!! …. राजेश जगताप, मुंबई ९८२१४३५१२९.

अस्थिसच्छिद्रता (ऑस्टिओपोरोसिस)

हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. […]

चण्याची पुडी

माझे मन आहे चण्याची पुडी जड विचारांची तळाशी बुडी भरले आहेत चणे फुटाणे तेच चव साधती साधेपणे मावत नाही काजू अक्रोड कशास हवी ती डोकेफोड ? लांब ठेविले बदाम मनुके यास्तव मन हे हलके फुलके चणा वाटतो आपलाच सहज बाकी भासती किंमती ऐवज नको बेदाणे खारीक पिस्ते तेच घडविती विवाद नस्ते चघळत बसतो एक चणा मुरवत […]

तुझ्या-माझ्या कविता

माझ्या झेपावत्या पंखांना तूरेशिमपाश बांधलास नि त्यांनी वसा घेतला मायेचा — प्रेमाचा आता या पंखांखालून तू होऊ नकोस – रानभरी ! शस्त्रांचीच सवय होती या माझ्या हातांना ! तू पेटत्या हातात फुलं दिलीस, शस्त्रं आपोआप बोथटली नि फुलांची वरमाला कधी झाली कळलंच नाही ! मी निघाले होते स्वातंत्र्याचा पत्ता शोधीत निखाऱ्यांचा वसा घेऊन सोन्याच्या बेड्या तोडून […]

अर्थ प्रेमाचा

“तू तुझी तब्येत आधी सांभाळ” ! “तू माझ्या आधी जायचं नाही” ! (निजधामाला) “तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर माझं कसं होईल अगं ?” या सूचना आणि प्रश्न माझा एक साठी पार केलेला मित्र, आपल्या पत्नीला देत आणि विचारत असतो. पहिले छूट यामागे आपल्या जोडीदाराबद्दलची काळजीच जाणवते, परंतु याकडे थोडं बारकाईने पाहिल्यावर, यामागची जाणवणारी एकटेपणाची भीती दिसायला […]

कोकण रेल्वे : असामान्य आणि अफलातून इंजिनिअरिंग

कोकण रेल्वे हा प्रोजेक्ट भारतासाठी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा आणि अवघड असा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होता ह्यात संशय नाही. हा प्रोजेक्ट अनेक खडतर परिश्रमानंतर यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. आज कोकण रेल्वे रोज तीन राज्यातून 741 कि.मी.चा प्रवास करते. हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ह्या तीन राज्यांतून जातो. कोकण रेल्वेची हद्द मुंबई जवळील रोहा येथून सुरू होते ते थोकूर ह्या मंगलोर जवळील दक्षिण कर्नाटकमधील रेल्वे स्टेशनला संपते. […]

वारसा…

आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही. […]

तुझ्यासाठी

कवितेच्या तलम पडद्याआडून माझ्या भावना तुला सागतात माझ्या विरहव्यथा शकुंतलेची व्यथा सांगावी दुष्यंताला तिच्या सखींनी तशी क्वचित दुर्लक्षिल्यासारखं क्वचित दाद देत तू म्हणतोस वा ।’ आणि निघून जातोन कसं सांगू तुला कवितेतून? माझ्या कविता तुझ्यासाठी असतात! –सौ. राजलक्ष्मी देशपांडे

1 124 125 126 127 128 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..