मूल्ये- जीवनाला अर्थ देणारे इंधन!
मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात. […]