पेट्रोलियम द्रावणे
पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊर्ध्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थांप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात. साधारणतः पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. […]