नैसर्गिक वायू
नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठ्या प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नैसर्गिक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात […]