वायुगळती
२००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट ” थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले. पण अमेरिकन वैज्ञानिक राथर याने केलेल्या संशोधनातून त्याला जे आढळून आले ते आश्चर्यजनक होते. शहरात वापरल्या […]