लोकशाहीचा चौथा स्तंभ ?
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या… […]