मोरया
तीन वर्षांपूर्वी माझ्या षष्ठ्याब्दीपूर्तीच्या निमित्ताने बाप्पावर केलेली कविता. काल रात्री स्वप्नात, एन्ट्री घेतली बाप्पाने. ठोके दिले बाराचे, त्याचक्षणी घड्याळाने. सोंड हलवत, मस्त झुलत – माझ्याजवळ आला, काय पहातोय मी? विश्वासच बसेना झाला. एकसष्ट मोदकांचं तबक – होतं हाती त्याच्या, बाप्पाच्या हातचे मोदक – वाट्याला येणार कुणाच्या? झटक्यात संपूर्ण ताटच त्याने – माझ्यासमोर धरलं, हातात घेऊन हात […]