नवीन लेखन...

अन्न हे पूर्णब्रह्म 

जगातल्या उपलब्ध असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये, अन्नासंबंधी अथवा भोजनासंबंधीचे सर्वात प्राचीन असे उल्लेख आढळतात ते भारतीय ग्रंथांमध्ये. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ऋग्वेदामध्ये परिपूर्ण आहारासंबंधी अनेक सूक्त आहेत. […]

लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखणे

लहान मुले म्हणजे साधारणपणे ८ ते १० वर्षे असताना कुठेही हिंडावे फिरतात. परत शाळेतील आपला अभ्यास संपवून खेळावयास जातात व सतत हुंदडत असतात. जेवण झाल्यावर सगळे काम अथवा जाग येताना आईचे काम करीत बाळ मोठ्याने ओरडत असते. आई माझे पाय वळत असतात, असे सांगून मोठ्याने ओरडत असते किंबहुना रडतसुद्धा असतो. आई बिचारी मुलांना जवळ ठेवून सतत पाय चेपत असते. […]

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. […]

स्वच्छतेसाठी साबणाची गरज

पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपड़े स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच. […]

शकून सांगती काही…

प्रबोधन पर्वात वृत्तपत्रांना खूप महत्त्व प्राप्त झाले. या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जाणीव जागृती केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षाबरोबरच नवप्रेरणा, जिज्ञासा यांचे खुले आकाश समाजासमोर उभे केले. अगदी त्याच प्रकारे मागच्या दहा-पंधरा वर्षात समाज माध्यमांनी नवी क्रांती घडवून आणली आहे. […]

मसनातलं जिनं

भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते. […]

गोरं करणारा साबण

गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे. […]

मोबाईल – एक खाजगीपण

काल परवाचीच गोष्ट एकजण एका जुन्या मित्राशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना तो म्हणाला मला अमुक तमुक अँप वर फोटो टाकता येत नाही काहीतरी शोधण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला , पण ते अँप मी ओपन करताच घाई घाई ने त्याने माझ्या हातून मोबाईल घेतला. […]

हम बनायेंगे एक आशियाँ !

काल पु.ल. वाचत बसलो होतो. ते एके ठिकाणी म्हणतात “तुम्हाला ‘मुंबईकर’ व्हायचं असेल तर तुम्हाला मुंबईत जन्माला येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या रहाण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा.” मी हे वाक्य वाचता वाचता विचारात पडलो… ‘अरे, हे तर अगदी माझ्या मनातले शब्द पुलं नी लिहिलेत’. कारण माझा ही जन्म मुबंईचाच की. […]

साबण आणि डिटर्जंट यांतील फरक

डिटर्जंट आणि साबण ( तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्ट्या काहीच साम्य नाही. डिटर्जंटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिटर्जंट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिटर्जंटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण करतात. कमी त्यामुळेच डिटर्जंटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिटर्जंट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल? […]

1 15 16 17 18 19 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..