डीएनएचे उपयोग
डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू. […]