दिवाळी आणि रांगोळी…
दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]