पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?
पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी. […]