तिखट मिरची
हा हू करताहेत, डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, पण तरीही मिरची, तिखट पदार्थ चवीनं खात आहेत, असे अनेक जण आपल्या अवतीभवती सापडतील. खरं तर तिखट ही चव नव्हे, तर तोंडाचा दाह आहे. मिरची कुळातील वनस्पतींत कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगं असतात. त्यापैकी ‘कॅप्सायनिन’ हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं. […]