आपण आपल्याशी
साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे. […]