आबेल पारितोषिक २०२२
प्रसिद्ध परंतु अल्पायुषी नॉर्वेजिअन गणितज्ञ नील्स हेन्रिक आबेल (१८०२-२९) यांच्या नावाने एक पारितोषिक, २००३ सालापासून दरवर्षी आहे. एका अर्थाने हे पारितोषिक गणिती जीवनगौरव या स्वरूपाचे असून त्या विजेत्याचे एकूण कार्य विचारात घेते, न की एखादे प्रमेय, सिद्धांत किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत. पदक आणि ७५ लक्ष नॉर्वेजिअन क्रोनर्स (सुमारे भारतीय रुपये ६,४८,००,०००) असे या पारितोषिकाचे स्वरूप असून, नॉर्वे सरकारच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली जाते. […]