नवीन लेखन...

पाश्चिमात्य जगत आणि आत्मनिर्भरतेचा जागर

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद किंवा विश्ववाद रायचा आकडा. राष्ट्रवादात यांच्यात छत्तीसचा राष्ट्र प्रथम, देशाच्या सीमांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे, उद्योगांचे आणि आस्थापनांचे हित प्रथम त्यासाठी स्वदेशीला प्राधान्य; आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट… कारण देश आत्मनिर्भर झाला तरच तो जागतिक महासत्ता होऊ शकेल हा विश्वास. […]

विजेवर चालणारी जहाजे

जागतिक तापमानवाढीचा महाराक्षस समोर उभा ठाकल्यावर माणसाला जाग आली आणि जगभर हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हल्ली बाजारात आलेली विद्युत ऊर्जेवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होय. पण, हे आता जमिनीवरील वाहनांपुरते मर्यादित राहिले नाहीये, तर जहाजे आणि विमानेसुद्धा विद्युत ऊर्जेवर चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जहाजांच्या बाबतीतील या प्रयत्नांचा आढावा घेणारा हा लेख… […]

इन्फंट्री डे

२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.
पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती. […]

निसर्ग सखा

निसर्गाकडून माणूस खूप काही घेत असतो. हवा, पाणी, प्रकाश याबरोबरच अन्नधान्य, फळं, फुलं, औषधं, वस्त्र, दागिने अशा साऱ्या गोष्टी निसर्गाची देणगी आहेत. मानवी जीवन सुखमय व्हावं, म्हणून भारतीय संस्कृतीतील ऋषि-मुनींनी निसर्गाचा खूप उपयोग केला. हे ऋषी म्हणजे नुसते ‘देव-देव’ करणारे आणि यजमानापुढे वाकणारे भिक्षुक नव्हते. […]

भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी

नीलम संजीव रेड्डी आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली. […]

सीएफएल बल्ब

वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले. […]

नैसर्गिक आणि कृत्रिम प्लास्टिक

डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. […]

श्री मोरया गोसावी आणि चिंचवड परंपरा

मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]

ट्यूबलेस टायर

मोटरसायकल किंवा चारचाकी वाहन नको त्या वेळी पंक्चर झाले तर काय डोकेदुखी होते हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठीच अलिकडे ट्यूबलेस टायर वापरले जातात. यात नावातच सांगितल्याप्रमाणे फक्त टायर असतो व ट्यूब मात्र नसते. […]

डीएनएचे ठसे

पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात. […]

1 27 28 29 30 31 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..