स्त्री आणि देवी
नवरात्रातले दिवे अखंडपणे घरोघरी असतील. मंदिरांमधून घरांमधून देवीची उपासना सुरू असेल. नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा सण, कधी कालीमातेच्या भयंकर, रणकर्कश रूपात, कधी शारदेच्या साहित्य-संगीत-ज्ञान-विज्ञानात रत झालेल्या रूपात, तर कधी समृद्धीचं, शांतीचं, मांगल्याचं आणि स्थैर्याचं वरदान देणाऱ्या शांत – तेजस्वी महालक्ष्मीच्या रूपात या शक्तीचं पूजन होईल. […]