हरवलेला खंड
पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो. अस्तित्वात असलेले खंड नाहीसे होत असतात, तसंच नवे खंड निर्माण होत असतात. प्राचीन काळी असाच एक गोंडवना नावाचा महाखंंड अस्तित्वात होता. या महाखंडात आजचे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिआ हे भूप्रदेश सामावले होते. […]