अनावश्यक भागांच्या मालिका..
आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे. […]