नवीन लेखन...

अमेरिकेतील वृक्ष-वेली..

अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात. […]

बालपणीचे कुतुहल

वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे. […]

सक्रिय एन्सेलॅडस

शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला. […]

ठकास महाठक

देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता . […]

भाकित

तसं पाहिलं तर रभाजीच्या विहिरीला जेमतेमच पाणी होतं. यावर्षी बऱ्याच दिवस पावसानं दडी मारल्यामुळे गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांची पंचायत झाली होती. जून महिना संपत आला तरी काळे ढग तोंड दाखवायला तयार नव्हते. त्यानं अन् रखमीनं सगळं यावर्षीच बी भरान कधीच तयार करून ठेवलं होतं फक्त त्यांना पावसाची वाट होती. […]

फळांचा राजा आंबा

फळांचा राजा म्हणजे आंबा. यालाच जास्त महत्त्वाचे आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातही आंब्याचे प्रमाण वाढत आहे. खुद्द अमेरिकेत १७व्या शतकात आंबा आला. एवढेच नाही तर संबंध युरोपातही आंब्याचा विस्तार झाला. आंब्याची चव, गोडी या कारणामुळे आंब्याला राजा म्हटले जाते. […]

प्रवास

नेमकाच ग्रॅजुयट झाल्यानं मलं पोस्ष्ट ग्रॅजुएशनसाठी औरंगाबादलं जायाच व्हतं.तिथल्या कॉलेजात मव्हा नंबर लागला व्हता.पहाटं नवची एष्टी व्हती.नवनंतर एष्टी नसल्यानं म्या पाहाटं लवकरच गडबडीनं आटपुण निंघायची तयारी केली.निघंतानी पुन्हा एकदा कागदपत्र निट तपासले. […]

3G? की दत्तगुरू

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त” भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला. […]

अमेरिकेतला ख्रिसमस

सुमारे चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट..१९८१ साल असावं.मी पाचवी -सहावीत असेन.बहीण माझ्यापेक्षा बरीच मोठी.ती कॉलेजात होती. बहीण माझं रोल मॉडेल..ती जे करेल ते करायचं एवढीच त्या वयात अक्कल होती.त्यामुळे तिची पाठ मी सोडत नसे. ती कुठे जातेय या सुगाव्यावर मी असे..अन् तिला मात्रं त्या वयात मला घेऊन जायला लाज वाटायची..त्यांच्या त्या फुलपाखरीवयातल्या रेशमी गप्पागोष्टींत माझा अडसर व्हायचा.त्यामुळे ती […]

1 4 5 6 7 8 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..