श्रीराम – सामाजिक समरसता
संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे. […]