भारतीय नृत्यांगना रुक्मिणीदेवी अरुंडेल
भारतात भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्याला त्याच्या मूळ ‘साधीर’ शैलीतून त्यांनीच पुनरुज्जीवित केले. पूर्वी भरतनाट्यम हे नृत्य देवदासी करत असल्यामुळे ह्या नृत्याला प्रतिष्ठा नव्हती. ह्या नृत्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी ह्यांनी केले. शिवाय त्या एक थीयोसोफिस्ट सुद्धा होत्या. त्या काळी भरतनाट्यमला समाजात अत्यंत खालच्या दर्जाचे व अश्लील असे समजत असत. […]