ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे
पं.अनंत केशव उर्फ राजाभाऊ कोगजे हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचे आईवडील दोघेही संगीतप्रेमी होते. वडील संगीत नाटकात काम करायचे. राजाभाऊंनी आपल्या वडिलांकडून संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी जबलपूरचे पं. गोविंदराव मुलतापीकर (विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य). यांच्याकडे पाठवण्यात आले. […]