वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड
मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे. […]