शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचाराची बजबजपुरी
आजच्या काळात निदान भारतात तरी कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटलेले नाही. शिक्षणक्षेत्र पुण्याचे आणि ज्ञानदानाचे कार्य सर्वश्रेष्ठ मानले जाते. शिक्षणाने माणसाचा उद्धार होतो आणि तो नीती-अनितीमधील फरक ओळखू शकतो असा गैरसमज सर्वत्र आढळून येतो, पण आज शिक्षणाच्या नावाखाली केवळ तुंबड्या भरण्याचे काम सुरू आहे. […]