May 2024
गम्मत एका देवळातील
गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते. […]
गुलाबी रिबिन
एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते. […]
कोकणातील अष्टविनायक
कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत. […]
वीर सावरकर – स्वातंत्र्य क्रांतिकारकाचे महामेरू
सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील,गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला. […]
रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर
रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्या पद्धतीने दिग्दर्शित करणार्या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे! […]
मृत्युंजय स्वा. सावरकर
दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते. […]
लाले दी जान !
समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते. […]
काळा ठिपका
खूप छान पाऊस पडत होता. आज कॉलेजमध्ये अभ्यासाची इच्छा कोणाचीच नव्हती. मुले वर्गात बसली होती खरी परंतु वाट पहात होती की कधी प्रोफेसर येतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही करण्याची परवानगी देतात. […]
कथा एका चावीची
जनतेची ही अपेक्षा चुकीची आहे, असं मला मुळीच म्हणायचं नाही. परंतु सर्वांच्याच समस्या पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविता येत नाहीत. काही तक्रारींमध्ये तांत्रिक अडचणी असतात. तर काही वेळेला कायद्याच्या बंधनामुळे पोलिसांचे हात बांधलेले असतात. […]