फिरकीच्या तालावर!
टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दुसर्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मागील टी ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडीयाला अपशकून करणार्या इंग्लंड संघाचा पुरेपूर बदला घेत टीम इंडियाने विश्वचषकाकडे अंतिम पाऊल टाकले आहे. कर्णधार रोहीतने फलंदाजीत आपली दादागिरी कायम राखत इंग्लंडला आपल्या बॅटचे पाणी पाजले तर गोलंदाजीत अक्षर, कुलदीप द्वयीने अक्षरशः धुमाकूळ घालत इंग्रजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. […]