नवीन लेखन...

संकल्प बायकोशी न भांडण्याचा

मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो. […]

कठडा

शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा. […]

श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था

ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]

कॅथेटर (कथा)

‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’ नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर […]

वटपौर्णिमा (कथा)

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस […]

आयुष्य

तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी, प्यावे तरी मरणार,  नाही प्यावं तरी मरणारचं समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी. आयुष्यात हवे असते बरंच काही, पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही , काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं. -गिरीश.

Whatsaap status बद्दल काही

या जगातला प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअप स्टेटस स्वतःच्या पद्धतीने वापरत असतो.  जसे एखादा नाराज असलेला व्यक्ती आपले दुःख त्याला कोणाला सांगायचे असेल तर तो इंटरनेट वर जाऊन त्याचा दुःखाचा संबंधित फोटोज् स्टेटस वर टाकतो. त्यातून त्या व्यक्ती अनेक अर्थ त्याचा ओळखीच्यांना सांगायचे असतात.  त्यात अनेक प्रकार आहेत. जसे कोणाचे प्रेम संबंध मध्ये भांडण झाले असेल तर त्याचा लगेच आजकल चे मुल मुली व्हॉटसअप स्टेटस वर त्या संबंधित लिहितात किंवा नाराजीचा emoji टाकतात. […]

रूपगंध बकुळ वृक्ष

हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच. […]

पतंग

संक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात. […]

लेडिज बायकांचं शॉपिंग

लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं. […]

1 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..