गणित सूत्र
एक राजा होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याला आपला उत्तराधिकारी शोधण्याची एक नामी युक्ती सुचली. त्याने एक सुंदर महाल बनविला. त्याचे प्रवेशद्वार अगदी भव्य बनविले. राजाने अशी दवंडी पिटली की त्या प्रवेशद्वारावर त्याने गणिताचे एक सूत्र लिहून ठेवले आहे. जो कोणी त्या सूत्राची उकल करेल त्याला फक्त हे प्रवेशद्वार उघडता येईल. तसेच प्रवेशद्वार उघडणाऱ्या व्यक्तीला राजाचा उत्तराधिकारी होता येईल. […]