होळीविषयी लोककथा
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. […]