नवीन लेखन...

हसावेसे वाटले म्हणून

तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले. […]

लाईफ लाईन

एकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष आता परमोच्च बिंदू वर पोहोचला … […]

सांगावेसे वाटले म्हणून – शोले

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या. […]

हॅप्पी न्यू Ear

रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं. […]

जहाजांची दुनिया

जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा. […]

लिहावेसे वाटले म्हणून

दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले. […]

स्वर यात्री

पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. ” […]

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव

मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील परंतु अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते. […]

गोव्यातील बामण भट

सोळाव्या शतकात पोर्तूगिजांनी त्या काळच्या गोव्याच्या १३४ गावातील हजारभर देवळे नेस्तनाबूत केली. या देवळात सेवा देणारे पुजारी, पुराणिक, अभिषेकी या भटांना (पुरोहितांना) गोव्यातून हाकलून लावले. त्याकाळी या भटांच्या ताब्यात उत्पन घेऊन निर्वाहासाठी दिलेल्या देवतेच्या मालकीची चांगल पिक देणीरी जमीन/बागायती होती. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..