गोव्यातील बामण भट
सोळाव्या शतकात पोर्तूगिजांनी त्या काळच्या गोव्याच्या १३४ गावातील हजारभर देवळे नेस्तनाबूत केली. या देवळात सेवा देणारे पुजारी, पुराणिक, अभिषेकी या भटांना (पुरोहितांना) गोव्यातून हाकलून लावले. त्याकाळी या भटांच्या ताब्यात उत्पन घेऊन निर्वाहासाठी दिलेल्या देवतेच्या मालकीची चांगल पिक देणीरी जमीन/बागायती होती. […]